
आजकाल लोकांची मती कधी फिरेल काय सांगता येत नाही. या नादात कोणी कुणाचा कधी जीव घेईल हेही सांगता येणे अवघड आहे. हिंगोलीत (Hingoli) अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, हिंगोलीत एका माथेफिरूने वेडाच्या भरात एका तरुणाने आपल्याच मावशी आणि आजीचे हातपाय बांधून कु-हाडीने वार करुन तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रोहिदास चऱ्हाटे (Rohidas Charhate) असं आरोपीचं नाव आहे.
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील 28 वर्षीय रोहिदास च-हाटे हा मानसिक रुग्ण स्वभावाचा तरुणा आपल्या 80 वर्षाच्या आजीसह राहत होता. त्यांच्याच शेजारी त्याची मावशी मंगलबाई बशीरे राहत होती. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास रोहिदास चऱ्हाटे याने वेडाच्या भरात आजी व मावशीचे हात पाय बांधून कुऱ्हाडीने मारहाण करण्यात सुरुवात केली. यात मावशी मंगलबाई यांचा जागीच मृत्यू झाला.हेदेखील वाचा- Mumbai: सांताक्रूझच्या कलिना परिसरात कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; घटना CCTV मध्ये कैद, आरोपीवर गुन्हा दाखल
तर रोहिदासची आजी या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
संपूर्ण घटनेची माहिती मिळवून पोलिसांनी रोहिदास च-हाटे याला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने हे कृत्य का केले याबाबत पोलिस अधिक चौकशी करत आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी प्रेमसंबंधास नकार दिल्याने नांदेडमध्ये (Nanded) प्रेयसीनेच आपल्या प्रियकराची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेड शहरातील आंबेडकर नगर परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी महिलेने भाऊ आणि मित्रांच्या मदतीने प्रियकराच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.