Satej Patil (Photo Credit: Facebook)

महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथे एका शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याचे धक्कादायक माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला केवळ अटक केली असून त्याला अजूनही शिक्षा न झाल्याने देशाच्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यातच महराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राज्यात लवकरच दिशा कायदा (Disha Act) लागू होणार असल्याची माहिती दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आंध्रप्रदेशात (Andra Pradesh) गेले होते. आता या शिष्टमंडळाने या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 3 सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध केले आहे. महाराष्ट्रात दिशा कायदा लागू झाल्याने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून महिलांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या सतत आपल्या कानावर पडत आहेत. यात केवळ महिला नसून किशोर, तरूण वयोगटातील तसेच लहान मुलींचाही समावेश आहे. आशा लज्जास्पद घटनेला कायमचे रोखण्यासाठी महाराष्ट्रात दिशा कायदा लागू करण्याचा विचार सुरू आहे. आंध्र प्रदेशात दिशा कायदा लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हेगाराला 21 दिवसात फाशी देऊन पीडितेला न्याय मिळवून देणारा दिशा कायदा लवकरच महाराष्ट्रातही आणणार, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. यावरून महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदा अंमलात आणण्यासाठी सरकारच्या हालचालींना वेग आला आल्याचे दिसत आहे. आंध्र प्रदेश सरकारच्या दिशा कायद्याच्या अनुषंगाने नवा कायदा तयार करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत केली असून, ही कमिटी 10 दिवसात कायद्याचा मसुदा सादर करणार आहे. यामुळे, लवकरात लवकर हा कायदा अस्तित्वात येण्यास मदत होणार आहे, असे ट्विट सतेज पाटील यांनी केले आहे. हे देखील वाचा- मुंबई: मरिन ड्राईव्ह येथे नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्याविरोधात अंदोलन करणाऱ्या 30-35 नागरिकांच्या विरोधात एफआयआर दाखल

ट्वीट-

दिशा कायद्याची सखोल माहिती घेण्यासाठी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ गृहमंत्र्यांसह हैद्राबादला गेले होते. या पथकाचे नेतृत्व आय जी श्रीमती. दोरजे करणार असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली होती. त्यांच्याकडून सविस्तर अहवाल आल्यानंतर येत्या अधिवेशनात या कायद्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन दिशा कायदा अमलात आणू, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला होता.