CM Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

राज्य मंत्रिमंडळाची (State Cabinet Meeting) आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्रातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. त्याचबरोबर योजना लागू करण्यात आल्या. यात एक महत्त्वाची घोषणा झाली ती म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून जलयुक्त शिवार योजनेची (Jalyukt Shivar Yojna) चौकशी व्हावी अशी मागणी अनेक नेत्यांकडून जोर धरत होती. त्यावर आज विचार करत आता या योजेची SIT मार्फत चौकशी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

यासोबत शालेय व क्रिडा विभाग, पाणीपुरवठा, वैद्यकीय शिक्षण, उच्च तंत्र शिक्षण, सहकार विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

नजर टाकूयात आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय कोणते?

1. नव्याने निर्माण करण्यात आलेला राज्य निवडणूक विभाग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयासाठी निर्माण केलेल्या 128 पदांना कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

2. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात डाळीसाठी दर नियंत्रक विधेयकाचे प्रारुप मागे घेणे.  हेदेखील वाचाजलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत खुली चौकशी होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

3. नागपूर शहर व परिसरातील रेल्वे मार्गावर आधुनिक प्रकारच्या वातानुकुलित बी.जी.मेट्रो ट्रेन सुरु करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

4. कोविडमुळे सहकारी संस्थांतील महत्वाच्या विषयांच्या मंजुरीचे अधिकार संचालक मंडळाला दुरुस्ती करणे

5. राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणा-या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपये वाढ करणे

6. केंद्र शासन पुरस्कृत "अटल भूजल (अटल जल) योजना" राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली.

7. मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुकडया/अतिरिक्त शाखा यांना 20 टक्के अनुदान देणे तसेच 20 टक्के अनुदान सुरु असलेल्या शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याच्या अटींमध्ये सुधारणा करणे

8. राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे

9. जलयुक्त शिवारची चौकशी करणे

या महत्त्वाची निर्णयांसोबतच महाराष्ट्र ज्या महाभयाणा कोरोना व्हायरस विषाणूशी लढत आहे त्या कोविडचे सादरीकरण करण्यात आले. थोडक्यात आजची राज्यमंत्रिमंडळाची बैठक ही खूपच महत्वपूर्ण होती.