आज राज्यात बहुतेक भागात पावसाच्या रिमझिम सरी (Monsoon) पाहायला मिळतील. आयएमडीच्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पडतील अशी शक्यता आहे. याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन-तीन दिवस पावसाने चांगलं झोडपल्यानंतर आज थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात आज अनेक ठिकाणी तर आज आणि उद्या कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (हेही वाचा - Anuskura Landslide: दरड कोसळल्याने वाहतुक सेवा विस्कळीत, अणुस्कूरा घाटातील घटना)
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पाहा पोस्ट -
दक्षिण कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 13, 2024
विदर्भात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामाव विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट हा देण्यात आला आहे.