रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अन्वय नाईक (Anvay Naik) आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टाच्या (Mumbai High Court) निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यानंतर काल (11 नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यांची तळोजा जेलमधून (Taloja Jail) सुटका झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी कारागृहाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान अर्णब गोस्वामी यांनी ANI ला शी बोलताना 'मुख्यमंत्र्यांना माझ्या पत्रकारितेबाबत अडचण असेल तर त्यांनी मला मुलाखत द्यावी' असे उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना खुलं आव्हान केलं आहे.

मला झालेली अटक ही बेकायदेशीर होती. सरकार स्वतंत्र असलेल्या मिडियाला असे मागे खेचू शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला मुलाखत द्यावी. मी त्यांच्याशी सहमत नसलेल्या मुद्द्यांवर माझ्याशी चर्चेचे आव्हान देतो असे अर्णब गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. हेदेखील वाचा- Ashish Shelar On Supreme Court: अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मानले विशेष आभार

दरम्यान अर्णब गोस्वामी यांची सुटका झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी तळोजा कारागृहाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी अर्णब यांनी गाडीबाहेर येऊन चाहत्यांना हात दाखवत 'वंदे मातरम्' अशा घोषणा दिल्या. त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या इतका जोश पाहायला मिळाला.

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्यासह इतर 2 जणांना देखील अंतरिम जामीन देण्यात आला आहे. 50 हजारांच्या जामिनावर या सर्वांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.