Anil Parab | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)
राज्य सरकारने संपावर तोडगा काढून पगार वाढ केली. पगार वाढ दिल्यानंतर काही कामगारांनी कामावर रुजू होण्याची सहमती दर्शवली आणि कामगार कामावर रुजू झाले. सर्व कामगार कामावर रुजू होतील तेव्हा त्यांच्या ग्रेडवर चर्चा होईल अशी माहिती एसटी कृती समितीची बैठक झाल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली. आज संयुक्त कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक पार पडली. बैठकीनंतरर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परब यांनी कामगारांना कामावर रूजू होण्याचे आवाहन केल. याचबरोबर त्यांनी जर संप सुरूच राहिला तर सरकार दिलेल्या पगारवाढीबद्दल विचार पुन्हा विचार करू शकतो, असा सूचक इशारा अनिल परब यांनी दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. या बैठकीनंतर अनिल परब यांनी माहिती दिली.
एसटी बंद ठेवणं एसटी महामंडळ तसेच कर्मचाऱ्यांना परवडणारं नाही. कोणाचंही नुकसान होऊ नये यासाठी कामगारांनी रुजू व्हावं. संप संपल्यानंतर काम सुरु होईल तेव्हा छोट्या-मोठ्या प्रश्नांवर चर्चा करता येईल. चर्चेची दारं खुली आहेत. आम्ही चार पावलं पुढे आलो आहेत. त्यामुळे कामगारांनी एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. कामगारांचे हक्क अबाधित ठेवणं हे आमचं काम आहे. प्रश्नांचं समाधानकारक उत्तर शोधता येईल,” असे परब म्हणाले.