IED blast by Naxals on a police vehicle in Gadchiroli (Photo Credit: ANI/Twitter)

गडचिरोली (Gadchiroli) येथील जांभूरखेडा गावाजवळ आज महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) नक्षवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगाचा स्फोट घडवण्यात आला असून यात 16 जवान शहीद झाले आहेत. तर 10 सुरक्षारक्षक जखमी झाले असून स्फोटात सी-60 जवानांची वाहनं टार्गेट करण्यात आली होती.

ANI ट्विट:

काल मध्यरात्रीपासूनच नक्षलींनी गडचिरोलीतील कुरखेडा भागीतील रस्त्याच्या कामावरील तब्बल 27 वाहनं पेटवून देत हल्ल्याला सुरुवात केली होती. कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल वाहने, यंत्रसामग्री आणि कार्यालये पेटून दिली. यात दोन जेसीबी, 11 टिप्पर, डिझेल आणि पेट्रोल टँकर्स, रोलर्स, जेनरेटर व्हॅन यांचा समावेश होता.

ANI ट्विट:

नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या वाहनांवर हल्ला करत संपूर्ण राज्यात असलेल्या महाराष्ट्र दिनाचा उत्साहावर पाणी फिरवले आहे.