'...तर मला बाळासाहेब ठाकरे यांचा 'नालायक' मुलगा म्हटले गेले असते'- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर अखेर राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. तसेच 30 नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी होणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची निवड झाल्यानंतर मुंबई येथे पत्रकार परिषदमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, "महाराष्ट्रातील जनतेसाठी  शिवसेना पक्ष नेहमीच  उभा राहिला आहे. आम्ही कधीच स्वत:साठी काहीच केले नाही. त्याचबरोबर मी प्रत्येकवेळी माझी जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आलोय. जर मी या जबाबदाऱ्या टाकून पळालो असतो तर, मला बाळासाहेब ठाकरे यांचा 'नालायक' मुलगा म्हटले गेले असते", असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

एएनआयचे ट्वीट-