Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay)

कौटुंबिक वादातून पतीने पोलीस स्टेशनमध्ये पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली. शेख सद्दाम शेख अहमद असे पीडिताचे नाव असून यात तो 90% भाजला आहे. तसेच ती आग विझवतानाही एक पोलीस स्टेशनमधील एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दाम हा एक व्यापारी असून त्याचा पत्नीशी वाद होत होता. आपल्या पत्नीशी झालेल्या भांडणातून त्याने थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यावेळी तेथे पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या पोलीस कर्मचारी आग विझविण्यासाठीस गेला असता तो देखाल किरकोळ जखमी झाला आहे.

सद्दाम हा 90% भाजला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर औरंगाबाद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा- मुंबई सेंट्रल स्थानकात ट्रेन येताच वृद्धाने फ्लॅटफॉर्मवरुन मारली उडी; जवानांच्या समयसूचकतेमुळे वाचले प्राण (Watch Video)

सद्दामचा त्याच पत्नीशी वाद होत असला तरी आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समजले नसून पोलीस तपास करत आहे.