
Honour Killing In Jalgaon: जळगाव (Jalgaon) मध्ये ऑनर किलिंगचा (Honour Killing) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमविवाह (Love Marriage) केल्याने वडिलांनी स्वतःच्या मुलीवर गोळीबार (Firing) केला. याशिवाय, आरोपीने त्याच्या जावयालाही जाळण्याचा प्रयत्न केला. जावयाचा जीव वाचला असला तरी, महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना जळगावच्या चोपडा तालुक्यात घडली.
काय आहे नेमकं प्रकरण?
वर्षभरापूर्वी, निवृत्त सीआरपीएफ पीएसआय किरण मांगले यांची मुलगी तृप्ती हिचा अविनाश नावाच्या मुलाशी प्रेमविवाह झाला होता. लग्न झाल्यापासून दोघेही पुणे शहरात राहत होते. आरोपी वडील या प्रेमविवाहावर खूश नव्हते. (हेही वाचा - Maharashtra Honour Killing: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना; आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या कुटुंबीयांकडून तरूणाचा खून)
मुलगी आणि जावई पाहताच गोळीबार -
शनिवारी रात्री, तृप्ती आणि अविनाश एका नातेवाईकाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी चोपडा शहरात आले होते. हे कळताच वडिल बंदूक घेऊन लग्न समारंभात पोहोचले आणि मुलीला पाहताच त्यांनी तिच्यावर गोळी झाडली. आरोपी वडिलांनी आपल्या जावयावरही गोळ्या झाडल्या. या गोळीबारात तृप्तीचा मृत्यू झाला आहे, तर अविनाशही गंभीर जखमी झाला आहे. (हेही वाचा - Honour Killing: गोत्राबाहेर लग्न केल्याने आई वडिलांनीच गळा दाबून केली मुलीची हत्या; कुटुंबातील इतर सदस्यांनी दिली साथ)
आरोपी वडिलांना बेदम मारहाण -
दरम्यान, गोळीबारानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी आरोपी वडिलांना बेदम मारहाण केली. तथापि, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. तथापि, जळगावमध्ये प्रेमविवाह करणाऱ्यांच्या हत्येची ही पहिलीच घटना नाही. या वर्षी जानेवारी महिन्यात, चार वर्षांच्या प्रेमविवाहानंतर, आरोपीने जावयाची हत्या केली होती.