New Police Stations: गृह विभागाने पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पाच नवीन पोलिस स्टेशन उभारण्यास दिली परवानगी
Pune Police | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राच्या गृह विभागाने (Home Department) पुणे ग्रामीण (Pune Police) पोलिसांच्या हद्दीत पाच नवीन पोलिस स्टेशन (New Police Station) आणि एक नवीन उपविभाग स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. पुणे ग्रामीण पोलिस हे पुणे जिल्ह्यातील तीन पोलिस अधिकारक्षेत्रांपैकी एक आहे. त्याच्या जबाबदारीच्या क्षेत्रांमध्ये पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड पोलिस (Pimpri Chinchwad Police) आयुक्तालयांतर्गत प्रामुख्याने शहरी भाग वगळून पुणे जिल्ह्यातील प्रामुख्याने ग्रामीण आणि निम-शहरी भागांचा समावेश होतो. अधिका-यांनी सांगितले की, पुणे ग्रामीण कार्यक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी नुकतेच महाराष्ट्र सरकारकडे अनेक प्रस्ताव सादर केले आहेत. ज्यामध्ये वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांची आकडेवारी लक्षात घेऊन पाच नवीन पोलीस ठाणी आणि एक पोलीस उपविभाग तयार करण्यात आला आहे.

दौंड उपविभाग, जो पोलिस ठाण्यांचा एक समूह आहे. त्याचे विभाजन करून शिरूर उपविभाग तयार केला जाईल. ज्यात शिरूर, शिक्रापूर आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाणी त्याच्या जबाबदारीच्या क्षेत्राखाली असतील. शिरूर उपविभागाच्या प्रमुखपदी पोलीस उपअधीक्षक दर्जाचे नवीन पदही मंजूर करण्यात आले आहे. मंचर पोलिस ठाण्याचे विभाजन करून पारगाव कारखाना पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. हेही वाचा BMC मध्ये नोकरीचं आमिष दाखवत एका व्यक्तीने 6 जणांना फसवत उकळले 13.34 लाख

वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचा भाग मिळून मालेगाव पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे.  वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यांतर्गत आणखी एक परिसर आता नव्याने मंजूर झालेल्या सुपा पोलिस ठाण्यांतर्गत येणार आहे. इंदापूर पोलिस ठाण्याचे विभाजन करून नीरा नृसिंहपूर पोलिस स्टेशन बनवण्यात येणार आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नवीन उरुळी कांचन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे.