Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभर घरातून ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व शाळा ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु होत्या. मात्र आता सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर झाली असून महाराष्ट्रातील सर्व ऑनलाईन पद्धतीने सुरु असलेल्या शाळा 1 मे ते 13 जूनपर्यंत बंद (Schools in Maharashtra) राहणार आहेत. यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन शाळेतून सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे थोडक्यात विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.

नवीन शैक्षणिक वर्ष 14 जून पासून सुरू होणार आहे. राज्यातील शिक्षक संघटनेकडून याबाबत वारंवार मागणी केली जात होती. अखेर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी आज यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.हेदेखील वाचा- Coronavirus Vaccines: महाराष्ट्र शासन खासगी रुग्णालयांकडून परत घेणार कोविड-19 लस; राजेश टोपे यांची माहिती

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता रहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्याबाबत खालील सूचना आपण जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना द्याव्यात, असे शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी कळवले आहे.

यानुसार 1 मे 2021 ते 13 जून 2021 पर्यंत उन्हाळी सुट्टीचा कालावधी असणार आहे. तसेच, पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये सोमवार 14 जून 2021 रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात आणि विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार 28 जून 2021 रोजी शाळा सुरू होतील, असे सांगण्यात आलं आहे.