आजचा दिवस हा शिवसेनेसाठी आणि संपूर्ण ठाकरे परिवारासाठी ऐतिहासिक दिवस आहे. कारण आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विधानभवनावर भगवा फडकवण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे आणि हे स्वप्न पूर्ण करणार आहे त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे. आज संध्याकाळी 6.40 मिनिटांनी शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यासह त्यांचे चिरंजीव तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी आमदार पदाची शपथ घेतली. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आदित्य ठाकरे आणि पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार उद्धव ठाकरे यां दोघांसाठी हा आजचा दिवस हा खूप ऐतिहासिक असणार आहे.
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सोशल मीडियावर नजर टाकली असता त्यांच्या ठाकरे आडनावाचं स्पेलिंग थोडं वेगळंच दिसतं. आपण मराठीत ठाकरे असं जरी लिहित असलो तरी स्पेलिंगनुसार त्याचा उल्लेख थॅकरे असा होतो. ठाकरे कुटुंबीय त्यांच्या नावाचे स्पेलिंग Thackeray असं लिहिण्यामागेही एक इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनी आडनावात Thackeray हा शब्द जोडला होता.
प्रबोधनकार ठाकरे हे भारतात जन्मलेल्या विल्यम मेकपीस थॅकरे (William Makepeace Thackeray) यांचे चाहते होते. त्यांचीच प्रेरणा घेऊन नावापुढे Thackeray हा शब्द जोडला. विल्यम थॅकरे प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार होते. त्यांचा जन्म कोलकत्त्यात 1781 मध्ये झाला होता. त्यांचे वडील इस्ट इंडिया कंपनीत सचिव होते. थॅकरे यांच्या कथा-कादंबरी यावर अनेक मालिका आणि चित्रपटही आले होते. शिवतीर्थावर पार पडणार उद्धव ठाकरे यांचा भव्य शपथविधी सोहळा; देशभरातील तमाम नेत्यांना निमंत्रणे, सुरक्षेसाठी 2000 पोलीस तैनात
केशव सिताराम ठाकरे यांनी प्रबोधनकार या नावाने लेखन सुरु केलं. त्यानंतर ते प्रबोधनकार ठाकरे या नावाने ओळखले जाऊ लागले. भारत सरकारने त्यांच्या नावाने 2002 मध्ये पोस्टाचं तिकिटही काढलं.
थोडक्यात ठाकरे घराण्याला जसा एक इतिहास आहे तसा त्यांच्या आडनावालाही तितकाच मोठा इतिहास आहे असं म्हणावं लागेल.