प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

हिंगोली (Hingoli) येथील एका विवाहित कुटुंबातील नवऱ्याला प्लॉट घेण्यासाठी पैसे हवे असल्यामुळे तिच्यापाठी त्याने पैशांसाठी तगादा लावला होता. तर माहेरुन पैसे का आणत नाहीस या शुल्लक कारणावर बायकोला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचसोबत पीडित महिलेला मानसिक आणि शारिरिक त्रास सुद्धा देण्यात आला असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे.

आरोपी हा पेशाने शिक्षक असून त्याला प्लॉट घ्यायचा होता. म्हणून तो बायोकाल माहेरुन पैसे आणण्याची जबरदस्ती करत तिला शारिरिक त्रास देत होता. तर पुन्हा एकदा आरोपीने तिला पैशांबद्दल विचारत पीडित महिलेला लोखंडी सळीने मारहाण केली आहे.

(नागपूर: खुल्या प्रवर्गातील तरूणांना नोकरी द्या अन्यथा गंभीर परिणामांसाठी सज्ज व्हा; सिटी बस स्टॉप वर धमकी पत्राने खळबळ)

या प्रकरणी महिलेने पोलिसात धाव घेत नवऱ्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल करताच आरोपी पसार झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. तर पीडित महिलेवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.