Mohan Bhagwat, RSS Chief | Photo Credit - Twitter/ANI)

हिंदू हा धर्म जगातील सर्व धर्म, पंथांचा आदर करतो. इस्त्रायल आणि हमास (Israel and Hamas) यांच्यात ज्या मुद्द्यांवर लढत आहेत त्या प्रकारचा संघर्ष भारताने केव्हाही पाहिला नाही. असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS ) प्रमुख मोहन (Mohan Bhagwat) भागवत यांनी शनिवारी (21 ऑक्टोबर) सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथील शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, या देशात एक हिंदू धर्म, संस्कृती आहे. जो सर्व पंथांचा आणि श्रद्धांचा आदर करतो. हा हिंदूंचा देश आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही इतर सर्व (धर्म) नाकारतो. एकदा तुम्ही हिंदू म्हटल्यावर ते होत नाही. मुस्लिमांनाही संरक्षण मिळाले हे सांगण्याची गरज आहे. हे फक्त हिंदू करतात. फक्त भारतच हे करतो. इतरांनी हे केले नाही,असे भागवत म्हणाले. उल्लेखनीय असे की, पुढील वर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकांपूर्वी 'पसमांदा' (मागासलेल्या) मुस्लिमांना आकर्षित करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांदरम्यान आरएसएस प्रमुखांची मुस्लिम टिप्पणी आली आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार मोहन भागवत यांनी म्हटले की, या देशात सर्व पंथांचा आणि धर्मांचा आदर करणारा एक धर्म आणि संस्कृती आहे. तो धर्म म्हणजे हिंदू धर्म. इतर सर्वत्र युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील आणि हमास-इस्रायल युद्धाबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. आपल्या देशात, अशा मुद्द्यांवर कधीही युद्ध झाले नाही, आमची अशी लढाई कधीच झाली नाही, आम्ही अशा मुद्द्यांवर कोणाशीही लढत नाही.

दरम्यान, संघाच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीला काही प्रमुख मुस्लिम नेते उपस्थित होते. ज्यांना या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यात लखनौचे सुप्रसिद्ध आंबा उत्पादक कलीमुल्ला यांचा समावेश होता. ज्यांना त्यांच्या बागेत आंब्याच्या नवीन जाती वाढवल्याबद्दल अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. भारताने पाकिस्तानला विरोध करणाऱ्या देशांना मदत करावी, असेही भागवत म्हणाले. आपण बांगलादेशला जशी मदत केली तशीच पाकिस्तानला विरोध करणाऱ्या देशांनाही मदत केली पाहिजे, असे ते म्हणाले.

एएनआय एक्स पोस्ट

सनातन धर्मावर टीका करणार्‍यांवरही त्यांनी सडकून टीका केली आणि हिंदू धर्मावर टीका करणार्‍यांना खरे तर याची माहिती नाही, असे सांगितले. "अशी अनेक उदाहरणे आहेत जेव्हा हिंदू धर्मावर टीका करणारे लोक हे जाणून घेतल्यानंतर त्याचे प्रशंसक बनले," ते पुढे म्हणाले. चार दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या भागवत यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी सलग बैठका घेऊन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यास सांगितले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना विशेषत: “देशविरोधी” घटक सक्रिय असलेल्या प्रदेशांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.