Sanjay Mali (Photo Credits: Twitter/ANI)

बुलढाणा : धर्माची बंधन झुगारून भावनिक नात्यांना महत्व देणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन नुकतेच बुलढाणा मध्ये पाहायला मिळाले. बुलढाणा (Buldhana)  मधील विभागीय वनाधिकारी संजय माळी (Sanjay Mali) यांनी आपल्या मुस्लिम ड्राइव्हरच्या वतीने रोजा पाळण्याचा निश्चय केला आहे. रमजानच्या (Ramadan) पवित्र महिन्यात अनेक मुस्लिम बांधव नेटाने रोजा पाळतात मात्र संजय यांचा ड्राइव्हर जफर हा काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्याला यंदा उपवास करणं शक्य नव्हतं. संजय माळी यांना यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर त्याच्या वतीने आपण रोजा पाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला.  'रमजान'च्या महिन्यात रोजा मोडून मुस्लिम युवकाने मिळवले पुण्य, 85 वर्षीय हिंदू महिलेचे प्राण वाचवायला केले रक्तदान

संजय माळी हे सरकारी अधिकारी असून त्यांचा वाहनचालक जफर याच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. याविषयी अधिक माहिती देताना संजय सांगतात की, आपला देश हा धर्मनिरपेक्ष आणि सलोख्यासाठी ओळखला जातो आणि या भावनेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. 6  मे ला आपण जफर याची भेट घेत तो रोजा ठेऊ शकतो का याबाबत विचारणा केली पण खालावलेली प्रकृती आणि त्यात काम यामुळे आपलं शरीर साथ देत नसल्याचे जफरने सांगितले त्यामुळे त्याच्या वतीने आपण रोज ठेवावा अशी कल्पना संजय यांना सुचली. यानुसार संजय रोजाचे उपवास करत आहेत ते पहाटे उठून जेवण करतात व त्यानंतर थेट संध्याकाळी सात वाजता उपवास सोडतात, रोजा करत असल्यापासून आपल्याला बरेच फताजेतवाने वाटत असल्याची संजय यांनी सांगितले.

ANI ट्विट

‘प्रत्येक धर्म आपल्याला काहीतरी चांगली शिकवण देत असतो. आपण सर्वांनीच सांप्रदायिक सलोख्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रथम माणुसकी पाहिली पाहिजे, धर्म द्वितीय आहे.अशा ठाम मताचे संजय माळी हे सरकारी अधिकारी म्हणजेजातीय व धार्मिक वादावरून भांडणाऱ्या लोकांना माणुसकीचा आदर्श देणारं उदाहरण म्हणायला हरकत नाही.