Coronavirus| Representational Image| (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) आज 2हजार 786 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 178 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 1 लाख 10 हजार 744 वर पोहचली आहे. यापैकी 4 हजार 128 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 56 हजार 49 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. सध्या भारतात एकूण 3 लाख 32 हजार 424 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 9 हजार 520 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 69 हजार 798 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूने महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना राज्यात आज मोठ्या संख्येत रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज 5 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.