High Tide In Mumbai 4th August: आज दुपारी 2.29 वाजता समुद्रात उसळणार 4.5 मीटर लांबीच्या लाटा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
High Tide (Photo Credits: Facebook)

 Mumbai Monsoon High Tide:  मुंबईसह उपनगरात शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाचे थैमान सुरु आहे, पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सूचित करण्यात आले आहे. तुफान पावसामुळे अगोदरच मुबईतील सखल भागांसह अनेक ठिकाणी पाणी साचण्याची घटना समोर येत आहेत. अशातच आज दुपारी समुद्रात मोठी भरती होणार असल्याचे समजत आहे. साधारण दुपारी 2  वाजून 29 मिनीटांनी सुमारे 4.5  मीटरच्या समुद्रात उसळणार आहेत. यावेळात नागरिकांनी किंवा मासेमारांनी समुद्राच्या जवळ जाणे टाळावे तसेच शक्य तितक्या सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

BMC ट्विट

पावसामुळे मुंबईतील अनेक धरणे भरल्याने नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे ज्यामुळे नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाच्या संततधारेचा मोठा फटका उपनगरांना देखील बसला आहे.Maharashtra Monsoon 2019: मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य-हार्बर रेल्वे सेवा ठप्प; सकल भागातही साचले पाणी

दरम्यान, ठाणे, भिवंडी , कल्याण परिसरात लोकांच्या घरात, दुकानात पाणी साचल्याने त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहतुकीच्या मार्गांवर देखील पावसामुळे मोठा परिणाम झाला आहे. लोकल गाड्यांसोबत लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रुळावर साचलेल्या पाण्यात अडकून पडल्या आहेत तर रस्त्यावर रस्ता वाहतुकीचे देखील तीन तेरा वाजले आहेत. एकूणच या सर्व प्रकाराने मुंबईकर नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.