पुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश
पुणे हेल्मेटसक्ती ( फोटो सौजन्य- फेसबुक )

येत्या नवीन वर्षात पुणेकरांना नव वर्षाची भेट म्हणून हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी हेल्मेटसक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा पुण्यात दुचाकीस्वार हेल्मेट घालत नाहीत. त्यामुळे दुर्दैवी अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच दिवसेंदिवस वाढत चालेल्या अपघाला आळा घालण्यासाठी हेल्मेटसक्ती करणे जरुरीचे आहे. तर पुणे सोडून इतर राज्यांमध्ये हेल्मेटसक्तीचे आदेश दिले आहेत. मात्र पुणेकर हेल्मेट वापरण्यास नकार देऊन आंदोलने करतात. त्यामुळे पुणेकरांसाठी हेल्मेटसक्ती हा वादाचा विषय राहिला आहे.

तर पुण्यात हेल्मेटसक्ती केल्यानंतरही हेल्मेट न घातल्यास वाहतूक पोलिसांकडून 500 रुपयांची पावती फाडण्यात येणार आहे. तसेच चौकाचौकात पोलीस हेल्मसक्तीच्या आदेशाचे पालन नागरिक करत आहेत की नाही हे पाहणार आहे.