महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे (Rain) आलेल्या पुरामुळे किमान 130 गावे बाधित झाली असून 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. मात्र, आतापर्यंत कुठूनही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे पूर्व महाराष्ट्रातील गडचिरोलीतील 128 गावांचा संपर्क तुटला आहे. राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने शनिवारी जारी केलेल्या बुलेटिननुसार, गडचिरोलीशिवाय मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
आसना नदीच्या काठावर वसलेल्या हिंगोली जिल्ह्यातील दोन गावे आणि शेजारच्या नांदेड जिल्ह्यातील हदगाव गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी हिंगोली जिल्हा दंडाधिकाऱ्यांना बोलावून लोकांना बाहेर काढण्याचे आणि इतर प्रकारची मदत देण्याचे निर्देश दिले. हिंगोलीत गेल्या 48 तासात मुसळधार पाऊस झाल्याने आसना नदीला पूर आला असून, त्याचे पाणी गावांमध्ये व शेतात शिरले आहे. शिंदे सध्या भाजप नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत आहेत. हेही वाचा Gadchiroli Flood-Like Situation: अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती
तुम्ही गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी योग्य व्यवस्था करा आणि त्यांना तात्पुरत्या निवाऱ्यात हलवा, असे मुख्यमंत्र्यांनी जिल्हा दंडाधिकार्यांना सांगितले. त्यांच्यासाठी जेवण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. गडचिरोली, हिंगोली आणि नांदेड जिल्हे गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रभावित झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून 120 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, असे विभागाने सांगितले. मुसळधार पावसामुळे, हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या आसना नदीला शुक्रवारी रात्री पूर आला,असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे वसमत तालुक्यातील सखल भागातील कुरुंदा व किन्होळा या गावांना मोठा फटका बसला आहे.