पुढच्या तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबतच हवामान खात्याने (Weather Department) पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे. हवामान शास्त्र विभागाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे, परंतु हा पाऊस हलक्या स्वरूपाचा असून अगदी किंचित भागांमध्ये पडू शकतो, तसेच राज्यातील तापमानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे ज्याप्रमाणे उन्हाळ्यात तापमान असते अशाच प्रकारचे तापमान बघायला मिळत आहे. (हेही वाचा - Sangli Weather Forecast For Tomorrow: सांगली चे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या हवामान ने वर्तवलेला अंदाज!)
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 'राज्यात पुढचे तीन ते चार दिवस विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. मात्र मान्सून पूर्णपणे राज्यात सर्व दूर दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभाग आणि कृषी विभागाचा सल्ला घेऊनच पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील आठवड्यामध्ये राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तसेच राज्यातील विविध भागांमध्ये उष्णतेची लाट वाढत चाललेली आहे.
दरम्यान, मान्सूनच्या प्रवासात 10 दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पाऊस पडत नाहीये. अशामध्ये कोकणामध्ये 21 जूननंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 24 जूननंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. दरम्यान, राज्यातील शेतकरी देखील चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. अशामध्ये चांगला पाऊस पडत नसल्यामुळे राज्यातील अनेक शहरांवर पाणी टंचाईचे संकट आहे.