राज्यात मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये 15 एप्रिल आणि 16 एप्रिल रोजी उष्णतेची लाट असणार आहे. त्यामुळे आयएमडीने नागरिकांना सतर्क केले आहे. आयएमडीने याबाबत अलर्ट जारी केलाय. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. आज आणि उद्या 36 ते 38 डिग्री सेल्सियस तापमान राहणार असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. (हेही वाचा - Monsoon Update: भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक 106% पर्जन्यवृष्टीची शक्यता; कसा असेल महाराष्ट्रातील पाऊस? घ्या जाणून)
पाहा पोस्ट -
Maharashtra | A heatwave warning issued for Mumbai, Raigad and Thane for April 15 and 16, 2024. Maximum temperature likely to range between 36-38 degree Celsius: IMD pic.twitter.com/ZGDSzbnaZK
— ANI (@ANI) April 15, 2024
मुंबई-ठाण्याच्या नागरिकांना प्रचंड उन जाणवत आहे. आएएमडीने त्यावर शिक्कामोर्तबच केले आहे. आयएमडीने याबाबत अलर्ट जारी केलाय. राज्यात तापमान वाढलं आहे. पुण्याच्या हडपसरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये देखील तापमानाने कहर केला आहे. डोकं आणि तोंड झाकून घेतल्याशिवाय नागरिकांना बाहेर पडणे मुश्किल झालं आहे. उष्ण झळा लागत आहेत. उष्माघाताचा धोका वाढला आहे.
हवामान विभागाने याच संदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडकरांसाठी दोन दिवस धोक्याचे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये 15 एप्रिल आणि 16 एप्रिल रोजी उष्णतेची लाट असणार आहे.
दरम्यान भारतात यंदाच्या वर्षी पर्जन्यमान सामान्य पातळीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी देशात 87 सेंटीमीटरच्या दीर्घ-काळाच्या सरासरीच्या 106% असा एकूण पाऊस पडेल. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ला निना (La Nina) परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने नुकताच हवामानाचा अंदाज आणि मान्सून 2024 संदर्भात भाकीत केले.