Harshavardhan Patil, Radhakrishna Vikhe Patil, Madhuri Misal | PC: Twitter

कोरोनाचा (Coronavirus) विळखा आता मुंबईसह राज्यभर पुन्हा घट्ट होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान मागील काही महिन्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याची स्थिती असताना लग्नसोहळे, पार्ट्यांमध्ये पुन्हा गर्दी वाढू लागल्याने कोरोनारूग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचं पहायला मिळालं आहे. यामध्ये राजकीय मंडळी देखील अपवाद नाहीत. आज भाजपा नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil ), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil )आणि माधुरी मिसळ (Madhuri Misal ) यांनी देखील आपण कोरोनाबाधित असल्याचं ट्वीट करत जाहीर केले आहे. दरम्यान त्यांनी मागील काही दिवसांत संपर्कात आलेल्यांना कोविड चाचणी (COVID Test)  करून घेण्याचं आवाहन केले आहे. तसेच काळजी घेण्याचंही आवाहन केले आहे.

हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता पाटील हीचा विवाह 28 डिसेंबर दिवशीच बिंधुमाधव ठाकरे यांचा मुलगा आणि बाळासाहेब ठाकरेंचा नातू निहार सोबत झाला आहे. या विवाहसोहळ्यात सहभागी सुप्रिया सुळेंनाही कोरोनाची लागण झाली आहे. आज हर्षवर्धन पाटील यांनी 'सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी ही विनंती. असं ट्वीट केले आहे'.

हर्षवर्धन पाटील

राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर मध्ये ते देखील एका विवाहसोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. आज त्यांनी ट्वीट करत 'आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व.

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.' असं ट्वीट केले आहे.

राधाकृष्ण विखे

पुण्यात पर्वती विधानसभा क्षेत्राच्या आमदार माधुरी मिसळ देखील कोरोनाच्या विळख्यात अडकल्या आहेत. त्यांनी 'सोमवारी करण्यात आलेली माझी कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली असून मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. माझी प्रकृती चांगली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोविड टेस्ट करून घ्यावी. काळजी घ्या, सुरक्षित रहा.' असं ट्वीट केले आहे.

माधुरी मिसळ

मुंबई सह राज्यात अचानक वाढलेली कोरोनारूग्णसंख्या सध्या चर्चेचा विषय बनली आहे. मुंबई मध्ये काल 2500 पेक्षा अधिक रूग्ण एका दिवसांत समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांकडून मागील काही दिवसांत कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं म्हटलं आहे. आजपासून मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं असून न्यू इयर सेलिब्रेशन सार्वजनिक मोकळ्या किंवा बंद ठिकाणी न करण्याचं आवाहन नागरिकांना आहे.