नवा सिनेमा आला की तो बॉयकॉट करणं किंवा सिनेकलाकारांवर टीकेची झोड उठवणं हे आता फक्त बॉलिवूड पर्यत मर्यादित राहिलेलं नाही तर या सगळ्याची सावली आता कुठेतरी मराठी चित्रपट सृष्टीवर देखील पडल्याचं जाणवत आहे. गेल्या आठवड्यापूर्वी हर हर महादेव हा सिनेमा चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. चित्रपटास मराठी प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली. अभिजीत देशपांडे दिग्दर्शित हर हर महादेव हा सिनेमात सुबोध भावे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत असुन अभिनेता शरद केळकरने बाजीप्रभू देशपांडेंची भुमिका साकारली आहे. तरी छत्रपती संभाजे राजी यांनी हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केली गेली अशी टिका केली होती. शिवरायाच्या इतिहासाची विपर्यास करण्यात आला असं मत व्यक्त करत संभाजीराजेंनी आक्रमक पावित्रा घेतला होता.
तर आता हर हर महादेव सिनेमाच्या या वादात राष्ट्रवादी कॉग्रेसनेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात काल ठाण्यातील विविआना मॉमधील हर हर महादेव या सिनेमाचा शो बंद पाडला. दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शो बंद पाडायचा असेल तर आमचे पैसे वापस द्यावे अशी मागणी मराठी रसिकांकडून करण्यात आली. तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि प्रेक्षकामध्ये चांगलीचं झटापट झाली. संबंधीत प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या जवळपास १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे ही वाचा:- Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास सुरु, जाणून घ्या राहुल गांधींचा आजचा संपूर्ण कार्यक्रम)
शो बंद पडताय मग आमचे पैसे परत द्या अशी मागणी करणाऱ्या मराठी रसिकांना राष्ट्रवादी च्या गुंडांनी केलेली मारहाण !!@CMOMaharashtra @mieknathshinde @mnsadhikrut @RajThackeray pic.twitter.com/l1yvh5toIj
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) November 7, 2022
Case filed against NCP MLA Jitendra Awhad & 100 of his workers at Vartak Nagar PS, Thane for forcibly closing show of film 'Har Har Mahadev' in Thane mall yesterday & assaulting the audience. Case registered u/s 141,143,146,149,323,504 of IPC. No arrest made so far: Thane Police
— ANI (@ANI) November 8, 2022
Hoologanism in the name of Shivaji Maharaj , NCP leader and Former Minister Jitendra Awhad forcefully stops show of Marathi movie 'Har Har Mahadev', Awhad supporters also beat up a viewer who opposed the agitation.#harharmahadevmovieteaser #Movie #ShivajiMaharaj pic.twitter.com/Hhd4DPBKdU
— Aditya Bidwai (@AdityaBidwai) November 7, 2022
राष्ट्रवादीच्या या आंदोलनानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी विवियाना मॉल गाठलं आणि चित्रपटाचा शो पुन्हा सुरू केला. यावेळी अविनाश जाधव यांनी शो बंद करून दाखवा असं थेट आव्हान आव्हाडांना दिलं. तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणाला राष्ट्रवादीकडून जातीय रंग दिला जात असल्यानं काहीच न बोलण्याची भूमिका घेतली आहे. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे मत आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना ‘हर हर महादेव' चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत.