Mumbai (संग्रहित संपादित प्रतिमा)

एका सुंदर शहरात राहून एका सुंदर आयुष्य व्यतीत करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अशा परिस्थितीत, आपण ज्या शहरात राहतो त्या शहरातील लोक आणि समाजजीवन कसे आहे हे जाणून घेणे आवश्यक असते. तसेच आपण ज्या शहरात घर घ्यायचा विचार करत आहे ते शहर राहण्यायोग्य आहे की नाही ही बाबदेखील महत्वाची ठरते. यासाठी एका ऑनलाइन सर्वेक्षण वेबसाइटने जगातील महत्वाच्या शहरांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार चंदीगड (Chandigarh) हे भारतातील सर्वात आनंदी शहर (Happiest cities in the world) म्हणून ओळखले गेले आहे. दुसरीकडे घर खरेदीच्या बाबतीत मुंबई (Mumbai) हे जगातील सर्वात कमी आनंदी शहर ठरले आहे.

या नवीन सर्वेक्षणात जगातील 20 शहरांची निवड करण्यात आली आहे. युनायटेड किंगडम (UK) च्या ऑनलाइन मॉर्गेज एडव्हायझरने जगभरातील शहरांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासात भारतातील एकूण 5 शहरांची निवड करण्यात आली आहे. या पाच शहरांमध्ये चंदीगड, सुरत आणि मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. घर खरेदी आणि आनंदी जीवनासाठी चंदीगड संपूर्ण जगात पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच, भारतातील पाच शहरांच्या यादीतही चंदीगड अव्वल आहे. तर मुंबई पाचव्या क्रमांकावर आहे.

या सर्वेक्षणानुसार स्पेनमधील बार्सिलोना हे घर खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम शहर ठरले आहे. बार्सिलोना जगातील 20 सर्वात आनंदी शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर इटलीचे फ्लॉरेन्स शहर दुसऱ्या क्रमांकावर आणि दक्षिण कोरियाचे उल्सान शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील चंदीगड शहर पाचव्या क्रमांकावर आहे. जागतिक शहरांच्या या यादीत भारतातील पाच शहरांना स्थान मिळाले आहे. यानंतर जयपूरने या यादीत 10 वे स्थान मिळवले. या यादीत चेन्नई हे 13 वे शहर आहे. मध्य प्रदेशच्या इंदूर 17 व्या स्थानावर आहे. (हेही वाचा: दस-याच्या मुहूर्तावर सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे शहरातील आजचे दर)

याशिवाय लखनौला या यादीत 20 वे स्थान मिळाले आहे. घर खरेदीच्या बाबतीत मुंबई हे जगातील सर्वात कमी आनंदी शहर ठरले आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात जगभरातील हजारो जिओ-टॅगिंग इन्स्टाग्राम पोस्टच्या आधारे या शहरांची निवड करण्यात आली आहे. घर खरेदी करण्यासाठी जगातील सर्वात कमी आनंदी शहरांच्या यादीत अमेरिकेतील अटलांटा आणि ऑस्ट्रेलियातील सिडनी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मुंबई व्यतिरिक्त भारतातील सुरत शहर हे जगातील सर्वात कमी आनंदी शहरांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे.