Guidelines for Reopening Of Gyms In Maharashtra: 25 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात जीम पुन्हा उघडणार; ही नियमावली पाळणं बंधनकारक
Gym (Photo Credit: PTI)

SOPs for Reopening Of Gyms In Maharashtra: महाराष्ट्रामध्ये 25 ऑक्टोबर म्हणजेच दसर्‍याच्या मुहूर्तावर जीम (Gyms), व्यायामशाळा पुन्हा खुल्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान आज त्याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन जारी करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीचा अवलंब करणं बंधनकारक असल्याचं सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात मार्च 2020 पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तेव्हापासूनच जीम, व्यायामशाळा बंद होत्या. यामुळे जीम मालक, प्रशिक्षकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. तसेच व्यायामशाळेतील उपकरणं देखील सांभाळणं, सुस्थितीत ठेवणं कठीण झालं होतं. मात्र आता सशर्त परवानगी देत दसर्‍याच्या मुहूर्तावर ही परवानगी देण्यात आली आहे.

सामान्य नियमावलीनुसार, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि हॅन्ड सॅनिटायझर हे जीम मध्ये प्रशिक्षक आणि व्यायामाला येणार्‍या प्रत्येक सदस्यांसाठी बंधनककारक असेलच. मात्र त्यासोबतच जीम मालक, चालकांना काही गोष्टींचं भान ठेवावं लागणार आहे. Unlock 5: BEST Buses ना पूर्ण क्षमतेने प्रवास करण्यास महाराष्ट्र सरकारची परवानगी

महाराष्ट्रात जीमसाठी नियमावली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नियमावली काय सांगते?

  • कंटेन्मेट झोन वगळता इतर ठिकाणी जीम पुन्हा करण्याला परवानगी असेल.
  • जीम मालक चालकांना नियमावलीचं पालन करणं बंधनकारक आहे.
  • आरोग्य मंत्रालयच्या गाईडलाईननुसार, 65 वर्षावरील व्यक्तींना, गरोदर महिलांना तसेच 10 वर्षाखालील मुलांना, गंभीर आजार असणार्‍या व्यक्तींना जीममध्ये प्रवेश नसेल.
  • जीम मध्ये दोन व्यक्तींच्या दरम्यान 6 फीट अंतर असणं गरजेचे आहे.
  • जीममध्ये फेस मास्क वापरणं अनिवार्य आहे.
  • जीमचा परिसर नीट सॅनिटाईज केला जाईल. परिसरासोबतच स्टाफ, व्हिजिटर यांचा वावर असलेला भाग बाजारात मान्याताप्राप्त सॅनिटायझरनेच वेळोवेळी स्वच्छ केला जाईल.
  • जिमची क्षमता पाहून मालकांना सदस्यांच्या सेशनचे शेड्युल बनवावे लागेल ते त्यांना कळवावे लागणार आहे.
  • प्रवेश करताना प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग होईल. तसेच हात सॅनिटाईज केले जातील.

भारत सरकारने देशात जीम खुल्या करण्यासाठी 5ऑगस्ट पासूनच परवानगी दिली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने त्याला परवानगी दिली नव्हती.आता अखेर कोरोनाची निवळती स्थिती पाहता मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये आता कोरोना वायरस निदानाचा दर कमी झाला आहे. सध्या राज्यात एकूण 150011 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.10% झाले आहे.