Death (Photo Credits-Facebook)

उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात फिरायला गेलेल्या मुंबई (Mumbai) येथील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. प्रचंड थंडी आणि बर्फात अडकल्याने या दाम्पत्याचा मृत्यू झाला. तब्बल 15 दिवस तपास केल्यानंतर स्थानिक पोलिसांना या दाम्पत्याचा शोध लागला. हे दाम्पत्य बर्फामध्ये (Snowfall) मृतावस्थेत सापडले. संजीव गुप्ता आणि आणि सिंशा गुप्ता असे या दाम्पत्यातील दोघांची नावे आहेत. हे दोघे पती पत्नी आहेत. हे दाम्पतम्य मूळचे मुंबईचे राहणारे आहे. काही दिवसांपूर्वी ते उत्तराखंड राज्यात फिरायला गेले होते.

प्राप्त माहितीनुसार, मुंबईकर रहवासी असलेले हे दाम्पत्य 13 डिसेंबर रोजी उत्तराखंड येथील जोशीमठ परिसरात फिरायला गेले होते. जोशीमठ परिसरातील गौरसे टॉप परिसरात फिरत असताना प्रचंड बर्फवृष्टी झाली होती. याच बर्फवृष्टीत हे दाम्पत्य अडकले असावेत आणि त्यांना पुन्हा बाहेर पडता आले नसावे. त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत. उत्तराखंडमध्ये मृत्यू झालेले संजीव गुप्ता हे 'झी न्यूज नेटवर्क'मध्ये कॅमेरामन कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आणि ते लोअर परेल येथील भारत मिल म्हाडा वसाहत येथे भाड्याने राहायला आले. त्यानंतर ते उत्तराखंडमध्ये फिरायला गेले आणि त्यांच्यासोबत ही घटना घडली. (हेही वाचा, Bhiwandi: भिवंडीत एका वर्षाच्या मुलाचा पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून दुर्दैवी मृत्यू)

प्रदार्घ काळ उलटूनही संजीव गुप्ता आणि त्यांच्या पत्नीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराला होत नव्हता. दुसऱ्या बाजूला स्तानिक पोलीस आणि प्रशासन यांनाही त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार यांचा संपर्क होत नव्हता. अखेर स्थानिक पोलिसांनी टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशनच्या माध्यमातून कुटुंबीयांशी संपर्क केला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवून मृतदेह गुप्ता कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.