firing File Image

 Mumbai Crime:  मुंबईत मध्यरात्री गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील माझगाव परिसरात मध्यरात्री गोळीबार झाला आहे. मध्यरात्रीच्या ३ वाजता गोळीबार झाल्याचे पोलिसांनी माहिती दिली. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास सुरु केला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आले नाही परंतु दहशत पसरवण्यासाठी गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री माझगाव येथील अफजल रेस्टॉरंट परिसरात अज्ञांतानी गोळीबार केला आहे. दहशत पसरवण्यासाठी हा गोळीबार केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अज्ञातानी एक गोळी झाडल्याची माहिती सुत्रांना मिळाली आहे. गोळीबारादरम्यान गोळी टाळण्यासाठी धावत असलेल्या व्यक्तीला दुखापत झाली. त्याला गोळी लागली नसून धावताना दगड लागल्याने दुखापत झाली. जखमी झालेल्या व्यक्तीला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सद्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

गोळीबार झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून तात्काळ फरार झाला आहे. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल करून घेतला आहे. भारतीय  दंड सहिंता कलम ३०७ आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा  भायकळा आणि इतर परिसरातील पोलिस या घटनेतील आरोपीला शोधण्यासाठी पथके तयार करत आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस  आरोपीचा शोध घेत आहे. परिसरात या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.