Whatsapp आणि अन्य सोशल मिडियावर COVID-19 बद्दल खोट्या बातम्या टाकल्यास ग्रुप अॅडमिडनला जबाबदार धरले जाणार- मुंबई पोलिस
Fake News on Social Media (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या फैलावासह सोशल मिडियावर (Social Media) खोट्या बातम्या पसरवून कोरोनाविरुद्ध आणखी दहशत पसरवून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवण्याचे काम काही महाभाग करत आहे. त्यामुळे अशा लोकांना चांगला जरब बसविण्यासाठी मुंबई पोलिसांनी महत्वाची घोषणा केली आहे. अशा पद्धतीची खोटी माहिती व्हॉट्सअॅप (Whatsapp) वा अन्य सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरवल्यास ग्रुप अॅडमिनला (Group Admin) जबाबदार धरले जाणार आहे. इतकच नव्हे तर त्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.

लोकांना कोविड-19 (COVID-19) विरुद्ध चुकीची आणि खोटी माहिती देणा-या लोकांना धडा शिकवण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. यात व्हॉट्सअॅपसह फेसबुक, ट्विटर, टिकटॉक सारख्या अन्य सोशल साइट्सचाही समावेश असेल. मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार, सोशल ग्रुपच्या माध्यमातून चुकीची महिती पसरवल्यास त्या ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरून त्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. Coronavirus: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांतून खोट्या माहितीचा प्रसार; आतापर्यंत 413 गुन्हे दाखल तर, 223 जणांना अटक

25 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करणे सुरु झाले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचे सोशल मिडियाच्या या सर्व साइट्सवर बारीक लक्ष राहणार आहेत. अशा ग्रुप अॅडमिनवर IPC 188 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रुप अॅडमिननेही आपल्या ग्रुप मेंमर्सकडून अशा प्रकारची माहिती पसरू नये याची काळजी घ्यावी असेही मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

सद्य घडीला महाराष्ट्रात एकूण 52,667 रुग्ण आढळले असून त्यातील 1695 जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची सद्यची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमाचे पालन करावे अशी अपेक्षा केली जात आहे.