ग्रामपंचायत निवडणूक 2021 ( Gram Panchayat Elections 2021) मध्ये सरंपंच (Sarpanch) आणि सदस्य पदांचा जाहीर लिलाव करुन निवडणूक बिनविरोध केल्याची घटना घडली. या घटनेची तातडीने दखल घेत सकृतदर्शनी पुरावे मिळाल्याने लिलाव पद्धतीने निवडणुका घेणाऱ्या अमराणे ( Umrane Gram Panchayat) आणि खोंडामळी (Khondamali Gram Panchayat) या दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने रद्द केल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही घोषणा केली.
महाराष्ट्र राज्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ट्विटरवरुन माहिती देताना सांगितले की, उमराणे (ता. देवळा, जि.नाशिक) आणि खोंडामळी (ता.जि. नंदुरबार ) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्य पदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त. त्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द- राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची घोषणा
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायत आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी या दोन ग्रामपंचायती राज्यभर चर्चेत आल्या. या गावांनी ग्रामपंतचायत बिनविरोध केली खरी. परंतू, त्यासाठी सरपंच आणि सदस्य पदांसाठी लिलाव पद्धत अवलंबून नवाच पायंडा पाडला. लिलाव पद्धतीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत पैशांचा वापर झाल्याचा आरोप झाला. (हेही वाचा, Maharashtra Gram Panchayat Election 2021: तब्बल 2 कोटी रुपयांच्या बदल्यात उमराणे ग्रामपंचायत बिनविरोध; बोली लावून थांबवली निवडणूक)
उमराणे (ता. देवळा, जि.नाशिक) आणि खोंडामळी (ता.जि. नंदुरबार ) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्य पदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त. त्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द- राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची घोषणा pic.twitter.com/coVjmkiByx
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 13, 2021
उमराणे, खोंडामळी या ग्रामपंचायती राज्यभर चर्चेत आल्या. प्रसारमाध्यमांतूनही या लिलावाची जोरदार चर्चा झाली. राज्य निवडणूक आयोगाने या गंभीर प्रकाराची दखल तातडीने घेतली. चौकशीचे आदेश दिले. निवडणुक आयोगाने केलेल्या चौकशीत पुरावे प्राप्त झाले. त्यामुळे निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारत या दोन ग्रांपपंचायत निवडणुकींचा कार्यक्रमच रद्द करुन टाकला.