शासनाकडून पूरग्रस्तांना 'अशी' मिळणार मदत; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही घोषणा
चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी अनेकजण मदतीचा हात देत आहेत. ज्यांना जसे शक्य होईल, त्यांच्याकडून त्या प्रकारची मदत केली जात आहेत. मदतीच्या यादीत दिग्गज कलाकार, मोठे व्यापारी, कार्यकर्ते तसेच सामान्य जनेतेचाही यात समावेश आहे. आज पूरग्रस्त लोकांशी संपर्क साधताना महसूल मंत्री तथा पालक मंत्री चंद्रकांत पाटील (chandarkant patil) यांनीही अनेक घोषणा केल्या आहेत.

पूरग्रस्त भागातील ग्रामीण भागातील घरांसाठी २ लाख ५० रुपये तर, शहरातील घरांसाठी ३ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या लोकांची घरे पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत, अशा कुटुंबांना एका वर्षाकरीता दर महिन्याला २ हजार प्रमाणे २४ हजार रुपयाचे भाडे माफ केले जाणार आहे. व्यवसायाचे नुकसान झालेल्या बचत गटातील महिलांना कर्ज मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, या मदतीने पूरग्रस्त लोकांचे खरेच नुकसान भरून निघेल का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला २७ कोटी अनुदान केल असल्याचे चंद्रकात पाटील यांनी सांगितले आहे.

(हे देखील वाचा- उत्तराखंड: पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला उत्तरकाशी येथे अपघात; दोघांचा मृत्यू)

पूरग्रस्तांना शासनाकडून कोणती मदत मिळणार?

पाण्याखाली गेलेल्या शेतीसाठी 1 हेक्टरची पीकावर कर्ज माफी मिळणार.-ज्या लोकांनी कर्ज घेतले नाहीत, अशा लोकांना उत्पन्नाच्या तिप्पट मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  गोठा बांधण्यासाठी ३ हजार रुपयांची मदत शासन देणार आहे.  पुरामुळे पडलेली घरे बांधून देणार आहेत.  पाण्याखाली गेलेल्या शेतीसाठीही पीक कर्ज माफ, विद्यार्थांना मोफत पुस्तके देणे, मुलींना  एसटी प्रवास मेाफत, अशा सर्व बाबींवर शासनाने लक्ष केद्रींत केले आहे.  पुरामुळे खराब झालेल्या पूलांच्या उभारणीचे काम लवकर हाती घेण्यात येणार आहबे . या प्रक्रियेसाठी तीन दिवसांचे टेंडर काढण्यास शासनाने मान्यता दिली आहे.