Government Employee Retirement: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी(Government Employees) आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती 60 वर्ष करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाची (Rajpatrit Mahasangh)या मागणीसंदर्भात नुकतीच सरकारसोबत बैठक झाली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे(Retirement) वय 60 वर्षे करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिल आहे. अशी माहिती महासंघाकडून देण्यात (Government Employees Retirement) आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी 14 जून रोजी अधिकारी महासंघ आणि प्रशासनासोबत संयुक्त बैठक पार पडली. (हेही वाचा:7th Pay Commission: खुशखबर! एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना यावर्षी मिळू शकतात 3 भेटवस्तू)
अनुभवी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला अधिक उपयोग व्हावा, या उद्देशाने सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्ष करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी दोघांकडून सेवानिवृत्तीच्या वयाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलं. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून ५० टक्के (Government Employees केलाय. त्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी तयार केला आहे. तो शासनाने तत्परतेने मंजूर करावा, ही मागणी करण्यात आली.
सुधारित पेन्शन योजनेच्या संदर्भात अधिसूचना काढावी. सरकारी नोकऱ्यांची तीन लाख रिक्त पदे भरावी, अशी मागणी देखील महासंघाकडून करण्यात आली आहे, अशी माहिती मिळत आहे.