गोवंडी: आईशी वाद घालणाऱ्या शिक्षकेला 12 वर्षीय मुलाने केले ठार, अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
Image used for represenational purpose (File Photo)

गोवंडी (Govandi) येथील एका धक्कादायक प्रसंगात 12 वर्षाच्या मुलाने आपली शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेला सुऱ्याने भोसकून ठार केल्याचे समजत आहे. सोमवारी, 16  सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या वेळी हा सर्व प्रसंग घडला. शिवाजीनगर (Shivajinagar) परिसरात खाजगी शिकवणी देणाऱ्या आयेशा असलम (Aayesha Aslam) या शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार,आयेशा आणि आरोपी मुलाची आई यांच्यात वाद झाल्याने  मुलाने रागात येऊन आयेशा वर सुऱ्याने वार केला. संबंधित अल्पवयीन मुलाला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (जेवर: आईकडूनच 8 महिनेच्या मुलाची हत्या, धान्यात लपवले अर्भक)

पोलिसांच्या माहितीनुसार,आयेशा आरोपी मुलाची नेहमीप्रमाणे आपल्या घरात शिकवणी घेत होत्या. घटनेच्या दिवशी मुलाच्या अभ्यासाची चौकशी करण्यासाठी मुलाची आई आयेशा यांच्या घरी आली होती. यावेळी त्यांनी घरातील काही सामान खरेदी करण्याचे कारण देत आयेशा यांच्याकडे उधार पैसे मागितले, ज्यावर शिक्षिकेने नकार दिला. यावरुन दोघींमध्ये वाद सुरु झाला. हा सर्व प्रकार घडत असताना आरोपी मुलगा सगळे काही पाहत होता. काहीवेळाने हा वाद विकोपाला गेल्यावर मुलाने चिडून जवळच पडलेला सुरा उचलून आयेशा यांच्यावर वार केला. आई व आयेशा यांच्या घरातील लोकांनी मध्यस्थी करून या मुलाला बाजूला केले आणि तसेच जखमी झालेल्या आयेशा यांना रुग्णालयात नेले. पण हॉस्पिटल मध्ये पोहचताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

दरम्यान, शिवजनगर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकारातून अल्पवयीन मुलांची बिघडत चाललेली मानसिकता आणि चिडचिडेपणा पुन्हा एकदा गंभीर विषय म्हणून समोर येत आहे.