
Baba Amte Google Doodle: 26 डिसेंबर ही ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे (Baba Amte) यांची जयंती. माणूसकीचे अप्रतिम उदाहरण असणाऱ्या बाबा आमटेंना गुगलने खास डुडल साकारत मानवंदना दिली आहे.
डॉ. मुरलीधर देवीदास आमटे हे बाबा आमटेंचे पूर्ण नाव. गांधींच्या विचारांनी प्रेरीत झालेल्या बाबांनी संपूर्ण आयुष्य दीनदुबळ्यांची सेवा करण्यात वेचले. एका कुष्ठरोग्याला पावसात भिजताना पाहून बाबांचे मन हेलावून गेले. त्याला त्यांनी घरी आणले आणि त्याची सेवा करु लागले. त्यानंतर असंख्य कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे सद्कार्य बाबांच्या हातून घडले. कुष्ठरोग्यांची सेवा करण्याच्या उद्देशातूनच त्यांनी चंद्रपूरात 'आनंदवन' आश्रम सुरु केला. नर्मदा बचाव आंदोलनातही बाबांचा सक्रीय सहभाग होता. असे महान समाजकार्य करणाऱ्या बाबांना गुगलने त्यांच्या खास मानवंदना दिली आहे. बाबा आमटेंचा जीवनप्रवास गुगल डुडलद्वारे दाखविण्यात आला आहे.




बाबा एकटेच समाजासाठी झटले नाहीत तर त्यांची पत्नी साधनाताई आमटे यांचाही यात मोलाचा वाटा होता. त्यानंतर त्यांची नवी पीढीही हा वसा पुढे चालवत आहे.