गोंदिया (Gondiya) येथील एका विना अनुदानित उच्च माध्यमिक वर्गांना मागील 15 वर्षांपासून शिकवणाऱ्या प्रा.केशव गोबाडे (Keshav Gobade) यांनी 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनी (Independence Day) विष घेऊन आत्महत्या केल्याचे समजत आहे. ही घटना जितकी दुःखद आहे त्यापेक्षाही यामागील दाहक कारण सध्या चर्चेत आहे. गोबाडे यांनी मागील 15 वर्षे अविरत सेवा करूनही त्यांना शासनाकडून कोणतेही अनुदान देण्यात आले नाही. परिणामी त्यांना इतका मोठा अवधी विनावेतन घालवावा लागला. साहजिकच यामुळे त्यांचे आर्थिक बाजूने खच्चीकरण झाले होते. अशातच मागील 6 वर्षांपासून त्यांची पत्नी मुलांसह सोडून गेली होती.
प्राप्त माहितीनुसार, आदिवासी ज्युनियर कॉलेज, झाशीनगर, जिल्हा गोंदिया येथे गोबाडे हे विनावेतन कार्यरत होते. शासनाच्या वेतन अनुदान दिरंगाई व हलगर्जीपणामुळे त्यांना या बिकट परिस्थीतीचा सामना करावा लागला होता. अशातही अनुदान येईल या आशेवर ते जगण्याचा प्रयत्न करीत होते. पण आता पुन्हा विधानसभा निवडणूका डोक्यावर येऊनही शासन निर्णय घेत नव्हते. (मुंबई: अभिनेत्री प्रज्ञा पारकर ने पोटच्या मुलीची हत्या करुन केली आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट)
अखेरीस अशा परिस्थितीत त्यांना नाईलाजाने त्यांना जीवन संपवावे लागले. यानंतर आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यातील विनाअनुदानित शिकक्षांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.