The Audi Q3 owner assaulted the Ola driver as other onlookers watched. (Photo credits: X/@ManojDu76464505)

घाटकोपरच्या असल्फा भागामध्ये एका कॅब ड्रायव्हरला धमकवल्याप्रकरणी पत्रकार Rishabh Chakravorty ला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर त्याला कोर्टाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हत्येच्या प्रयत्नाचा (Attempt to Murder) देखील गुन्हा दाखल केला आहे. कॅब चालकाच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याचं समोर आलेलं आहे. शुक्रवारी झालेल्या या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर व्हिडीओ वायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर मध्ये असल्फा भागामध्ये रिषभ च्या गाडीचा धक्का कॅब ला लागला. यानंतर कॅब ड्रायव्हरने रिषभ कडे झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली.

रिषभ पैसे न देताच पुढे निघून गेला. त्यानंतर कॅब चालकाने त्याचा पाठलाग केला. तो रिषभ च्या घाटकोपरच्या घरी गेला. एलबीएस मार्गावर जेव्हा रिषभची गाडी थांबली तेव्हा कॅब चालकाने मागून गाडी धडकली. रिषभ गाडीतून उतरला आणि त्याने कॅब चालकाला मारहाण केली. त्याला उचलून जमीनीवरही आदळलं. यामुळे कॅब चालकाच्या डोक्याला, अंगाला जबर जखमा झाल्या.

घटनेचा वायरल व्हिडीओ

पोलिसांनी रिषभ आणि त्याच्या पत्नीचा जबाब नोंदवून घेतला आहे. कॅब चालक जा गोवंडीचा रहिवासी आहे. त्याला सुरक्षा रक्षकाकडून राजावाडी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले, मात्र त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली असल्याने नंतर त्याला जे जे रूग्णालयात नेण्यात आले आहे. त्याला शुद्ध आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.