Ghatkopar Hoarding Collapse Update: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेस 52 उलटले, बचावकार्य अद्यापही सुरुच; मृतांचा आकडा 17 वर
Ghatkopar Hoarding Collapse Accident (Photo Credit : ANI)

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेला तब्बल 52 तास उलटले असून  उलटल्यानंतरही याठिकाणी अद्याप शोधकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी पेट्रोल पंपावरील इंधनाचा सर्व साठा रिकामा झाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF), महापालिका आणि पोलिसांनी पोकलेनच्या साहाय्याने होर्डिंगचा (Ghatkoper Hoarding) ढिगारा उपसायला सुरुवात केली. गॅस कटरच्या साहाय्याने होर्डिंगचे तुकडे करुन लोखंडी तुकडे बाजूला केले जात आहेत.  घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरूो आहे. अजून बरेच जण आणि वाहनं ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Ghatkopar Hoarding Collapse: तब्बल 48 तास उलटल्यानंतरही अद्याप शोधकार्य सुरु, ढिगाऱ्याखाली आणखी 30-40 जण अडकल्याची भिती)

सकाळपर्यंत या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला होता. आता मृताचा आकडा वाढून 17 वर गेला आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या दुर्घटनेत 75 जण जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे. याठिकाणी एक जोडपं आणि एक वाहन चालक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेतील मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आज सकाळी बचाव पथकाने रेस्क्यू ऑपरेशनला पुन्हा सुरुवात केली. त्यावेळी लोखंडी ढिगाऱ्याखाली अनेक गाड्या आढळून आल्या. या गाड्यांमध्ये लोक अडकून पडले असण्याची शक्यता आहे. मात्र, या दुर्घटनेला तब्बल 52 तास उलटून गेले आहेत. त्यामुळे ढिगाऱ्याखाली लोक अडकून असतील तरी त्यांच्या जिवंत असण्याच्या आशा फार कमी आहेत. दरम्यान, घाटकोपर होर्डिंग प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिंडेविरोधात पंतनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भावेश भिंडे सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.