Ghatkopar Hoarding Collapse: तब्बल 48 तास उलटल्यानंतरही अद्याप शोधकार्य सुरु, ढिगाऱ्याखाली आणखी 30-40 जण अडकल्याची भिती

सध्या NDRF जवानांची एक तुकडी, अग्निशमन दलाच्या जवान आणि मुंबई महानगरपालिकेची टीम बचाव कार्य करत आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

Ghatkopar Hoarding Collapse: तब्बल 48 तास उलटल्यानंतरही अद्याप शोधकार्य सुरु, ढिगाऱ्याखाली आणखी 30-40 जण अडकल्याची भिती

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेला तब्बल 48 तास उलटले असून  उलटल्यानंतरही याठिकाणी अद्याप शोधकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता. बुधवारी सकाळी पेट्रोल पंपावरील इंधनाचा सर्व साठा रिकामा झाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF), महापालिका आणि पोलिसांनी पोकलेनच्या साहाय्याने होर्डिंगचा (Ghatkoper Hoarding) ढिगारा उपसायला सुरुवात केली. गॅस कटरच्या साहाय्याने होर्डिंगचे तुकडे करुन लोखंडी तुकडे बाजूला केले जात आहेत. गेल्या दोन ते तीन तासांमध्ये या लोखंडी ढिगाऱ्यातून तब्बल 18 बाईक्स आणि सहा ते सात कार बाहेर काढण्यात आल्या आहेत. ही परिस्थितीत पाहता होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली आणखी 30 ते 40 जण असल्याची शक्यता आहे. तसे घडल्यास या दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ होऊ शकते.  (हेही वाचा - Mumbai Metro Service Update: मुंबई मध्ये आज संध्याकाळी 6 नंतर Jagruti Nagar ते Ghatkopar Metro Stations दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव सेवा राहणार बंद)

सध्या NDRF जवानांची एक तुकडी, अग्निशमन दलाच्या जवान आणि मुंबई महानगरपालिकेची टीम बचाव कार्य करत आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 70 जणांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आले होते. आज सकाळी बचाव पथकाने रेस्क्यू ऑपरेशनला पुन्हा सुरुवात केली. त्यावेळी लोखंडी ढिगाऱ्याखाली अनेक गाड्या आढळून आल्या.

आज सकाळी बचाव पथकाने रेस्क्यू ऑपरेशनला पुन्हा सुरुवात केली. त्यावेळी लोखंडी ढिगाऱ्याखाली अनेक गाड्या आढळून आल्या. या गाड्यांमध्ये लोक अडकून पडले असण्याची शक्यता आहे. मात्र, या दुर्घटनेला तब्बल 48 तास उलटून गेले आहेत. त्यामुळे ढिगाऱ्याखाली लोक अडकून असतील तरी त्यांच्या जिवंत असण्याच्या आशा फार कमी आहेत.

(The above story first appeared on LatestLY on May 15, 2024 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).