Victim | Representational Image (Photo Credits: Pixabay)

बलात्कार पीडित (Rape Victim) महिलेला गावातून हद्दपार करण्याचा निर्णय ग्रामसभेच्या माध्यमातून घेण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त आहे. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई येथील पाचेगाव येथे घडल्याचे समजते. पाचेगाव ग्रामपंचायतीच्या (Georai Gram Panchayat) सभेत याबाब ठराव ( Gram Panchayat Resolution) करण्यात आला. या ठरावावर सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्याची धक्कादायक माहिती आहे. घडल्या प्रकाराची प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चा आहे.

विशेष म्हणजे गावकऱ्यांनी केवळ ठराव घेऊनच न थांबता पोलीस अधिकक्षकांकडेही या महिलेला गावबंदी करावी यासाठी निवेदन दिले. दरम्यान, पोलीस अधिक्षकांनी निवेदनाबाबत काय भूमिका घेतली याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, घडल्या प्रकारामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे.

या प्रकरणात काही महिला कार्यकर्त्या पीडित महिलेच्या बाजूने उभा राहिल्या आहेत. या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचा ठराव घेणाऱ्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे म्हटले आहे. तसेच, संबंधितांना निवडणूक लढविण्यासाठी 10 वर्षांची बंदी घालावी अशीही मागणी केली आहे. (हेही वाचा, Maharashtra: पिंपरी चिंचवडमधील 26 वर्षीय एअर होस्टेसवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक; Tinder ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपवर झाली होती ओळख)

प्राप्त माहिती अशी की, संबंधित महिलेवर पाच वर्षापर्वी बलात्कार झाला होता. या प्रकरणात आरोपी दोषी आढळले. त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली. त्यानंतर पीडितेच्या मुलीवरही अत्याचार झाल्याचे पीडितेचे म्हणने आहे. या प्रकरणातून आपल्यावर गावकरी दबाव टाकत आहेत. आपल्याला गाव सोडण्यासाठी सांगण्यात येत आहे, असे पीडितेने म्हटले आहे.