Gender Equality Signal: आता दादर परिसरातील ट्रॅफिक सिग्नल आणि साइन बोर्डवर दिसणार महिलेची आकृती; आदित्य ठाकरेंची माहिती
Gender Equality Signal (Photo Credit : Twitter)

भारत पितृसत्ताक देश आहे असे म्हटले जाते. दररोजच्या जीवनात स्त्री-पुरुष यांच्यामधील असमानता (Inequalities) अनेक गोष्टींमध्ये दिसून येते. असेच एक छोटे उदाहरण जे कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही, ते म्हणजे ट्रॅफिक सिग्नल (Traffic Signals) आणि ट्रॅफिक लाइट. स्टॉप बोर्ड किंवा ट्रॅफिक लाइटवर बहुतेक ठिकाणी पुरुषाचे चित्र दर्शवले जाते. या चिन्हाच्या लिंगाबद्दल कोणीही बोलत नाही, त्यामुळे हे पुरुष असलेले चिन्ह सर्व जेन्डरचे प्रतिनिधित्व करते. मात्र आता काळ बदलत आहे. स्त्रियांनाही पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता दादरच्या (Dadar) सिग्नल्सवर तुम्हाला स्त्रियांची आकृतीही दिसणार आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) या लिंग समानतेबद्दल (Gender Equality) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात- ‘जर आपण दादर परिसरातून गेलात तर आपल्याला असे काहीतरी दिसेल ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. वार्ड जीएन बीएमसी एका साध्या कल्पनेच्या माध्यमातून लिंग समानता सुनिश्चित करीत आहे – सिग्नलच्या चिन्हामध्ये आता महिला आकृती देखील दिसणार आहे!’

आदित्य ठाकरे ट्वीट-

सर्वसामान्यपणे आतापर्यंत आपण सिग्नल्सवर विविध चिन्हांसाठी पुरुषांची आकृती पहिली असेल. लिंग असमानतेचे हे फार मोठे उदाहरण आहे. याबाबत कधीही कुणीही काही बोलले नाही. आता बीएमसीने पुढाकार घेऊन दादर परीसारातीक सिग्नल्सवर महिलांची आकृती बसवली आहे. याद्वारे बीएमसी लिंग समानतेला प्रोत्साहन देताना दिसून येत आहे. (हेही वाचा: ठाणे प्रशासनाने मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना धाडली तडीपारची नोटीस, कोर्टात नेत असताना कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी)

दरम्यान, आज आदित्य ठाकरे यांनी, अक्षय कुमारने फिटनेस-हेल्थ ट्रॅकिंगची साधने मुंबई पोलिसांना दिल्याबद्दल अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. या साधनांमुळे पोलिसांना ऑक्सिजन लेव्हल, बॉडी टेम्परेचर आणि हृदयाच्या गतींचे रीडिंग समजण्यास मदत होणार आहे. कोविड युद्धात या गोष्टी उपयुक्त ठरू शकतील.