Gas Leak in Pune: पुणे शहराजवळील पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी पहाटे एलपीजी सिलिंडरमधून गळती होऊन झालेल्या स्फोटात पाच जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना पिंपरीतील बौद्धनगर येथील एका खोलीत पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या खोलीत पीडित महिला राहत होत्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, "घरात राहणाऱ्या एका व्यक्तीने गॅसची शेगडी पेटवली आणि त्याचवेळी स्फोट झाला, असा अंदाज अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे, त्यामुळे गॅसची गळती होत असतानाच हा स्फोट झाला." हे देखील वाचा: Investment for Happy Retirement: आनंदी वृद्धापकाळासाठी महत्त्वाचे गुंतवणूक पर्याय, Senior Citizen Day 2024 निमित्त जाणून घ्या सेवानिवृत्ती टीप्स
गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात ५ जण जखमी :
Maharastra | Five people suffered burn wounds in a fire that started from a leak in the LPG cylinder in a house in Pimpri-Chinchwad, Pune: Pimpri-Chinchwad Fire Department
(Source: Pimpri-Chinchwad Fire Department) pic.twitter.com/2lIygj1YTO
— ANI (@ANI) August 21, 2024
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
पाच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतरचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये घरात सामान विखुरलेले दिसत आहे. त्यावेळी अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी हजर होते.