| (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) मुंबईहून (Mumbai) कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या खुपच आहे. त्यामुळे ऐन वेळी गर्दीचा फटका आणि तिकिट न मिळाल्याने प्रायव्हेट गाडी करुन कोकणात जावे लागते. परंतु नालासोपारा (Nalasopara) येथे अल्पदरात बस सेवा उपबल्ध करुन देऊ असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले. त्यासाठी नागरिकांचे आधारकार्ड, रेशनकार्डासह प्रति व्यक्ती 100 ते 500 रुपयांचे बसभाडे स्विकारणात आले.

तसेच या सेवेचा लाभ घेण्यासाठी पक्षाकडून बॅनरसुद्धा झळकावण्यात आले. शिवसेने कोकणात जाण्यासाठी बस सोडल्या. परंतु भाजपकडून विरार येथून एकही बस सोडण्यात आली नाही. यामुळे 500 पेक्षा अधिक नागरिकांकडून पैसे घेऊन सुद्धा त्यांना ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली नाही. यामुळे नागरिकांनी भाजप विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

नागरिकांनी गणेशोत्सवासाठी अल्प दरात कोकणात जाण्यासाठी सेवा उपलब्ध होणार असल्याने कोणताही विचार न करता तिकिटांचे पैसे भरले. त्यानुसार नागरिकांना त्याची पावती सुद्धा देण्यात आली. पण गाडीची सोयच नाही असे कळल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी भाजपच्या या प्रकारावर जोरदार टीका केली. (Ganeshotsav 2019: गणेश भक्तांना घेऊन कोकणात जाणारी एसटी जळून खाक; 57 जण थोडक्यात वाचले, मुंबई-गोवा महामार्गावरील घटना)

घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना शोधून देत पोलिसांच्या ताब्यात दिले. यावर वसई विरार मधील महापालिकेचे स्थायी समिती सभापती यांनी नागरिकांची भेट घेत बसची व्यवस्था करुन देऊ असे आश्वासन दिले. मात्र पैसे देऊनसुद्धा प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी बसची व्यवस्था केली नसल्याने नागरिक चांगलेच भडकले होते.