Ganesh Chaturthi Eco-Friendly Idols (File Image)

गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) सण आता 75 दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशभक्तांची मूर्तींच्या बुकिंगसाठी आता लगबग सुरू झाली आहे. सार्वजनिक मंडळांची देखील तयारीला सुरूवात झाली आहे. अशामध्ये आता एक महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे. 4 फुटांवरील मूर्तींसाठी पीओपीचा वापर करता येणार आहे. मात्र चार फुंटापेक्षा कमी उंच्या मूर्तांसाठी शाडूची माती बंधनकारक असणार आहे. पीओपीला (POP) पर्याय सुचवण्याबाबतची मार्गदर्शक तत्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप जारी न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आजपासून मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेते-साठवणूकदारांना 'एक खिडकी' पद्धतीनं ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पीओपी च्या मूर्त्या या पर्यावरणाला पूरक नसल्याने त्याला अनेकांचा विरोध होता. पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. मोठ्या मूर्त्यांसाठी पीओपी शिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकारकडे 'पीओपी'ला पर्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे. आता जरी त्या जारी केल्या, तरी या निर्णयाची अंमलबजावणी यंदा तातडीनं आणि सरसकट करता येणार नसल्याचं मूर्तिकारांचं म्हणणं आहे. Ganeshotsav 2023: यावर्षीपासून घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अनिवार्य; मंडळांचे शुल्क आणि ठेवी माफ, BMC चा मोठा निर्णय .

बीएमसीकडून मूर्ती विक्रेत्यांसाठी आजपासून 'एक खिडकी' पद्धतीनं ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इको फ्रेंडली गणेशमूर्तींना चालना देण्यासाठी बीएमसी मोफत शाडू माती आणि जागा उपलब्ध करून देणार आहेत.

मूर्ती निर्मात्यांना पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दल यांच्याकडून एका खिडकीतून परवानगीसाठी ऑनलाइन फॉर्म मिळतील, जेणेकरून त्यांना या परवानग्यांसाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागणार नाही. सोबत डिपोझिट 1000 रूपये असणार आहे. त्यांना आपण फक्त शाडू मातीच्या मूर्ती बनवतील किंवा साठवतील असे हमीपत्रही सादर करावे लागेल. त्यांना नवरात्र उत्सवादरम्यानही ही जागा वापरण्याची परवानगी दिली जाईल,” असे एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले.