कोकणवासीय शिमगा (Shimaga) आणि गणेशोत्सव (Ganeshotsav) हे दोन सण मोठ्या धामधुमीत साजरे करतात. यंदा मुंबई, पुण्यातून कोकणात जाणार्या चाकरमान्यांची संख्या पाहता रस्ते मार्गावरील प्रवाशांना टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी देण्यात येणारे स्टिकर्स 30ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहेत. कोकणात जाणार्या गणेशभक्तांना ही स्टीकर्स त्यांच्या जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO Office) मिळतील. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफीची ही विशेष सवलत गणेशोत्सवासाठी जाताना आणि परतीच्या प्रवासासाठी लागू असणार आहे. Ganeshotsav 2019: खुशखबर! गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ, चंद्रकांत पाटील यांची माहिती
कसे असतील पथकर माफीचे स्टीकर्स?
कोकणात जाणार्यांना संबंधित वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आदी माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात, वाहतूक पोलीस चौकी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये द्यावी लागणार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी समन्वय साधून हे स्टिकर्स उपलब्ध करुन देणार आहेत.
कोणत्या मार्गावर कोकणवासियांना मिळणार टोलमाफी?
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता मुंबई-पुणे प्रवासात पुणे ते कोल्हापूर-कागल मार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मुंबई (वाशी), पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, किणी तासवडे, मुंबई प्रवेशद्वार, खेड-शिवापूर येथील पथकर नाक्यांवर वाहनांना टोलमाफी देण्यात येईल. या काळात पथकर नाक्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अधिक मनुष्यबळ, ट्रॅफीक वार्डन, हँड होल्डींग मशिन ठेवण्यात यावे अशी माहितीदेखील देण्यात आली आहे.
कोकणवासीयांना गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाता यावं यासाठी MSRTC च्या बस आणि रेल्वेच्या अधिक फेर्या चालवण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती देखील राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.