Nagpur Murder: धक्कादायक! नागपूर येथे भर चौकात जुगार अड्डा चालक किशोर बिनेकर याची  निघृण हत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Nagpur Murder:  नागपूर (Nagpur) येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी एका बिअर बारमध्ये तलवारी नाचवून धुमाकूळ घालणाऱ्या गुन्हेगारांची वरात पोलिसांनी काढली होती. ही घटना ताजी असताना संपूर्ण नागपूरकरांना हादरून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. नागपूर- अमरावती रोडवर भर चौकात एका कुख्यात जुगार अड्डा चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना आज दुपारी सांयकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने संपूर्ण नागपूर हादरून गेले असून याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशा मागणींनी अधिक जोर धरला आहे.

किशोर बिनेकर हत्या करण्यात आलेल्या जुगार अड्डा चालकाचे नाव आहे. किशोर बिनेकर हे आपल्या कारने पेट्रोल पंपाच्या जवळून जात असताना आरोपींनी त्यांची कार अडवली आणि त्यांना बाहेर खेचलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर, धार शस्त्रांनी त्यांची हत्या केली. त्यानंतर ते बाईकवरून पसार झाले. नागपूर येथील भोळे प्रेट्रोल पंपाजवळ नेहमी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. याच ठिकाणी ही घटना घडली आहे. सध्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात आरोपी आधीच पेट्रोल पंपाजवळ दबा धरून बसले होते. त्यांनी अचानक हा हल्ला केला आहे. ज्यात किशोर बेडेकर यांचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Sangli Crime: सांगली जिल्ह्यात नऊ महिन्यांत 62 महिलांवर बलात्कार, 255 जणींवर अत्याचर, 193 पीडितांकडून विनयभंगाची तक्रार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण घटल्याचे समजत होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे.