Sangli Crime: सांगली जिल्ह्यात नऊ महिन्यांत 62 महिलांवर बलात्कार, 255 जणींवर अत्याचर, 193 पीडितांकडून विनयभंगाची तक्रार
Molestation| File Photo

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी देशात आणि पर्यायाने राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लागू केल्याच्या निर्णयाला आता सहा महिन्यांपासून अधिक काळ उलटून गेला. दरम्यानच्या काळात गुन्हेगारी बऱ्याच प्रमाणत कमी आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकले. मात्र, असे असले तरी महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं मात्र तशीच किंवा नेहमीच्या तुलनेत काहीशी अधिक वाढल्याचे दिसते. एकट्या सांगली (Sangli Crime) जिल्ह्यात गेल्या 9 महिन्यांच्या काळात महिलांवरील बलात्काराची 62 प्रकरणं नोंदली गेली. तर 255 प्रकरणं अत्याचाराशी निघडीत आहेत. तर सुमारे 193 महिलांनी विनयभंगाची तक्रार नोंदवली आहे. सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन्समध्ये नोंदवण्यात आलेल्या प्रकरणांची ही एकूण आकडेवारी आहे.

सांगली येथील कडेगाव परिक्षेत्रात कार्यरत असलेल्या एका पोलिस निरीक्षकावर तरुणीला फूस लावून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विपीन हसबनीस नावाचा हा पोलिस निरीक्षक सध्या फरार आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकाद महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चिला जात आहे. (हेही वाचा, महिलांवर बलात्कार करणा-यास नपुंसक करण्याचा 'या' देशाने घेतला निर्णय, तर 14 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणा-याला मिळणार 'ही' कठोर शिक्षा)

सांगली जिल्ह्यात आणखीही काही गंभीर प्रकरणे घडली आहेत. जसे की, तुंग येथील एका लहान मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिची हत्या केली. असेच एक प्रकरण कडेगाव तालुक्यातही उघडकीस आले होते. या प्रकरणा दोन वृद्धांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. काही काळानंतर ही अल्पवयीन पीडिता गर्भवती राहिली. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने पीडितेला गर्भपात करण्याची परवानगी दिली. या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (National Crime Records Bureau) देशातील एकूण गुन्हेगारीचा अहवाल ठेवते. एनसीआरबीच्या माहितीनुसार, देशात दर पंधरा मिनिटाला एक या प्रकमाणात बलात्काराचा गुन्हा दाखल केला जातो. गेल्या काही वर्षांतील बलात्कारांच्या घटनांची आकडेवारी तपासली असता सन 2017 मध्ये देशभरात महिलांवरील बलात्काराचे 500 गुन्हे दाखल झाले. महिलांवरील गंभीर स्वरुपाच्या आत्याचारसंदर्भात 2018 मध्ये देशभरात 2,37,660 इतक्या घटना घडल्या. देशाच्या तुलनेत राज्याबाबत बोलायचे तर 2017 मध्ये महाराष्ट्रात 31,376, 2018 मध्ये 29723 तर 2019 मध्ये 29 हजार 948 महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. या घटनांबाबत महाराष्ट्रातील विविध पोलीस स्टेशन दप्तरी नोंद आहे. एनसीआरबीकडेही याबाबत माहिती उपलब्ध आहे.