मॅकडॉनल्ड्स (McDonald’s) इंडिया ‘100 टक्के अस्सल चीझ’चा वापर करत आहे, असे भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या प्रशासनाखाली, देशातील सर्वोच्च अन्न मानक नियामक यंत्रणा असलेल्या अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (FSSAI) पडताळणीअंती स्पष्ट केले आहे. मॅकडॉनल्ड्स इंडिया आपल्या उत्पादनांमध्ये 100 टक्के अस्सल चीझ वापरते, कोणतेही चीझसदृश पदार्थ किंवा पर्यायी पदार्थ वापरत नाही, असे पडताळणीत स्पष्ट झाले आहे. ( FDA Action On McDonald's: मॅकडोनॉल्डने 'चीज’च्या नावाखाली ग्राहकांची केली फसवणुक, अन्न आणि औषध प्रशासनाने दिला दणका)
‘ज्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, त्या पदार्थांच्या घटकांमध्ये चीझ किंवा चीझ उत्पादने होती तसेच डेअरीसंदर्भात ज्याला चीझसदृष पदार्थ (अॅनालॉग) म्हटले जाते, ते पदार्थ यात कोणत्याही स्वरूपात आढळले नाहीत’ असे एफएसएसएआयच्या पुष्टीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
मॅकडॉनल्ड्स इंडियाला (डब्ल्यूअँडएस) एनएबीएल (परीक्षण व अचूकता मापन करणारे राष्ट्रीय अधिमान्यता मंडळ) अधिमान्यताप्राप्त प्रयोगशाळेने केलेल्या परीक्षणाचाही निकाल काल प्राप्त झाला आहे. यामध्येही कंपनीच्या सर्व उत्पादनांमध्ये 100 टक्के अस्सल चीझ वापरले जात असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. क्लीनचिट मिळाल्यामुळे मॅकडॉनल्ड्स इंडियाने (डब्ल्यूअँडएस) आपल्या चीझचा समावेश असलेल्या उत्पादनांच्या नावांमधील ‘चीझ’ ही संज्ञा कायम ठेवली आहे. काही दिवसांपुर्वी मॅकडॉनल्ड्स आपल्या पदार्थांमुधून चिझ सदृष्य पदार्थ वापरत असल्याची बातमी समोर आली होती.