पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) सांगितले की, त्यांनी रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चार जणांना ताम्हिणी घाट (Tamhini Ghat) परिसरात ताब्यात घेतलं आहे. त्यांना एका नवजात अर्भकाची (Newborn) हत्या (Murder) करून फेकून दिल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. नवजात बालकाच्या 27 वर्षीय आईने 11 फेब्रुवारी रोजी पोलिसांकडे धाव घेतली होती. चौकशी सुरू केली. याप्रकरणी पुणे ग्रामीण हद्दीतील पौड पोलिस ठाण्यात (Paud Police Station) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील मुळशी (Mulshi) तालुक्यात राहणाऱ्या या महिलेने रत्नागिरी जिल्ह्यातील 27 वर्षीय तरुणासोबतच्या संबंधातून 30 जानेवारी रोजी एका मुलाला जन्म दिला होता.
पोलीस तपासात आता असे समोर आले आहे की, 5 फेब्रुवारीच्या पहाटे तो माणूस, त्याचा भाऊ आणि आणखी दोन साथीदारांनी एका कारमध्ये ताम्हिणी घाटातील एका निर्जन भागात आई-बाळ जोडीला जबरदस्तीने नेले. त्यांनी मुलाला सोबत घेतले आणि काही वेळाने त्याच्याशिवाय परतले. या महिलेने 11 फेब्रुवारी रोजी पुणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला. पौड पोलिस ठाण्यातील अनेक पथके तयार करण्यात आली आणि संशयित आणि नवजात बालकाचा शोध सुरू करण्यात आला. हेही वाचा NCP MLA Sandeep Kshirsagar Viral Video: 'पुष्पा'च्या प्रभावाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणतात 'झुकेगा नही..!'
तपास सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी या चौघांना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून अटक केली. संशयितांनी आम्हाला सांगितले आहे की त्यांनी बाळाचा गळा दाबून खून केला आणि त्याचा मृतदेह ताम्हिणी घाट परिसरात फेकून दिला. आम्ही मृतदेहाचा शोध घेत आहोत. अटक केलेल्या चार जणांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पौड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.