NCP MLA Sandeep Kshirsagar Viral Video: 'पुष्पा'च्या प्रभावाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणतात 'झुकेगा नही..!'
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार संदी क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनीही आपल्या जाहीर भाषणातून एका सभेत 'पुष्पा' चित्रपटातील 'झुकेगा नही साला' हा डायलॉग वापरण्याचा मोह आवरला नाही.
'पुष्पा' (Pushpa Movie) चित्रपटाने केवळ तरुणाची नव्हे तर राजकारण्यांनाही वेड लावले आहे. जाहीर भाषणांतूनही याची प्रचिती येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार संदी क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनीही आपल्या जाहीर भाषणातून एका सभेत 'पुष्पा' चित्रपटातील 'झुकेगा नही साला' हा डायलॉग वापरण्याचा मोह आवरला नाही. निमित्त होते बीड जिल्ह्यात झालेल्या एका सभेचे. या सभेतच बोलताना आमदार क्षीरसागरांनी डायलॉगबाजी करत उपस्थितांना खळखळून हसवले. आणि अनेकांवर टोलेबाजीही केली.
विरोधकांवर जोरदार प्रहार करत संदीप क्षीरसागर यांनी एक तीर दोन निशाणे साधण्याचा प्रयत्न केला. विरोधक आमच्या विरुद्ध एकत्र येऊन लढणार आहेत. कितीही लढा. जोपर्यंत माय-माऊलींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. तोपर्यंत मला काही फरक पडणार नाही. एवढीमोठी निवडणूक लढली, ही तर नगरपालिकेची निवडणूक. त्याचं काय एवढं. अलिकडेच मी एक पिक्चर पाहिला. खूप दिवसांनी पिक्चर पाहिला. या पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे. 'झुकेगा नही साला'.
ट्विट
Pushpa Video: राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांना 'पुष्पा'ने लावले वेड; म्हणतात...! pic.twitter.com/NCVgI8uGPH
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 13, 2022
दरम्यान, संदीप क्षीरसागर यांनी स्टेजवरुन डायलॉगबाजी करताच उपस्थितांनाही हसू आवरले नाही. त्यांनीही टाळ्यांचा कडकडाट करत क्षीरसागर यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. एकूणच काय तर राजकारण्यांमध्येही पुष्पा चित्रपटाची क्रेझ चांगलीच पाहाला मिळत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 13, 2022 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

