Harshvardhan Jadhav (Photo Credits: PTI)

Harshvardhan Jadhav Appeals For Divorce: माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Former MLA Harshvardhan Jadhav) यांनी संजना जाधव (Sanjana Jadhav) यांच्यापासून घटस्फोट (Divorce) घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. मला भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जावई म्हणू नका, अशी विनंतीदेखील हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी पत्नी संजना जाधव यांच्याशी घटस्फोटाची प्रक्रिया सुरु केली आहे. यासंदर्भात हर्षवर्धन जाधव यांनी माहिती दिली आहे. कौटुंबिक त्रासाला कंटाळून हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Ganeshotsav 2020: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ; एकनाथ शिंदे यांची माहिती)

हर्षवर्धन जाधव यांच्या या निर्णयामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धन यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत रावसाहेब दानवे यांच्या त्रासामुळे घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, यापूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेत आपल्या पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचं म्हटलं होतं.

यापूर्वी हर्षवर्धन यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या. रावसाहेब दानवे यांच्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली, असं गंभीर वक्तव्यदेखील जाधव यांनी केलं होतं. रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघे मिळून आपल्याला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.